पणजी मनपाचे मार्केट खुल्या जागेत सुरू करण्यास मान्यता

0
56

पणजी शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पणजी महानगरपालिकेने खुल्या जागेत मार्केट सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली असून एसओपीचे पालन करून खुल्या जागेत मार्केट सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. येत्या मंगळवारपर्यंत खुल्या जागेत मार्केटची व्यवस्था केली जाऊ शकते. पणजी महानगरपालिकेचे मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना भाजीपाला, मासळी यांच्यासाठी वणवण करावी लागत आहे. मार्केट बंद असल्याने मासळी, भाजीपाल्याची विक्री शहर आणि परिसरातील पदपथावर केली जात आहे.
मार्केटमधील विक्रेत्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास मान्यता दिली जाणार आहे. राज्यात संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि, पणजी मार्केटमधील भाजीपाला, कडधान्य, फळे विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. नागरिक बाजारात गर्दी करतात म्हणून मार्केट बंद ठेवण्याचे सांगितले जात आहे. पणजी मार्केटमध्ये योग्य नियोजन करून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जाऊ शकतात.

मागील चार दिवसांपासून शहरातील नागरिकांना भाजीपाला, मासळी खरेदीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने मासळी मार्केट बंद ठेवले आहे. परिणामी पदपथावर तर काही ठिकाणी वाहनांतून मासळीची विक्री केली जात आहे.
मनपाने तात्पुरते मार्केट सुरू करण्यासाठी मार्केटजवळ जागेची पाहणी केली आहे. त्याठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी, खरेदी करणार्‍यासाठी जागेची आखणी केली जाणार आहे. तसेच मासळी मार्केट एसओपीचे पालन करून सुरू केले जाणार आहे. विक्रेते आणि ग्राहकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे. अन्यथा, मासळी मार्केट बंद करावे लागेल, असे इशारा देण्यात आला आहे.