Home Featured गँगस्टर छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त चुकीचे ः एम्स

गँगस्टर छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त चुकीचे ः एम्स

0

कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त काल प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाले होते. मात्र ते वृत्त चुकीचे असून छोटा राजनवर उपचार सुरू असल्याचे एम्स इस्पितळातून सागंण्यात आले. छोटा राजन कोरोना संक्रमित असल्याचे समोर आल्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अजूनही जिवंत असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून करण्यात आला आहे.