Home बातम्या बिहारमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

बिहारमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

0

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गोवा, कर्नाटक, झारखंड आणि आता बिहारमध्येही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाउन घोषत करणारे बिहार हे देशातील ९ वे राज्य ठरले आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी औद्योगिक संस्था चेंबर ऑफ सीआयआयने देशात व्यापक पातळीवर आर्थिक हालचालींवर मर्यादा आणण्याची मागणी केली आहे. तर देशातील व्यापार्‍यांची संघटना सीएआयटीने लॉकडाऊनचे समर्थन केले आहे.