देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे चाचणी करणार्या प्रयोगशाळांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर आसीएमआरकडून या चाचण्यांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकदा एखाद्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुन्हा त्या व्यक्तीची चाचणी केली जाऊ नये, रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याची चाचणी करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. आयसीएमआरकडून यासंदर्भात काढलेल्या पत्रकात लक्षणे असलेल्या रुग्णांनी अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा. त्यांनी कोविड नियमांचे पालन करावे, राज्यांनी मोबाईल टेस्टिंग लॅबोरेटरीजचा वापर करावा अशा सूचना केल्या आहेत.