कोरोना लसीकरण घ्यावे का?

0
191
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज)

या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात सर्वत्र जोरात चालू असले तरी भारतात जनसामान्यांच्या मनात बरेच समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान मांडले आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी आली, तिसरी आली अशा बातम्याही ऐकू येत आहेत. भारतात कोरोना येऊन एक वर्ष उलटून गेलं. दरम्यान सर्वांचेच जीवन विस्कळीत होऊन गेले आहे. या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात सर्वत्र जोरात चालू असले तरी भारतात जनसामान्यांच्या मनात बरेच समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत.
लस घ्यावी की घेऊ नये? या प्रश्‍नाच्या कोड्यात बरेच लोक अडकले आहेत. काहींच्या मते या लसीचे साईड इङ्गेक्ट जास्त आहेत. लस जर लाईफलॉंग आपल्याला कोरोना व्हायरसपासून सुरक्षा देणार नसेल तर मग ही लस का घ्यावी? लसीकरणाने आपल्याला काय ङ्गायदा होईल? लसीकरणाने मृत्यू झालेत का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे जरी मिळत नसली तरी एक गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, कुणीच कुठल्याच गोष्टीची १००% गॅरंटी देऊच शकत नाही.
ज्या-ज्या व्यक्तींना लसीकरणाचा त्रास झाला, त्यांच्यासाठी एवढेच म्हणता येईल की ‘जित्यामागे ब्रह्मराक्षस.’ ज्यांनी-ज्यांनी घाबरत, मनात शंका-कुशंका घेऊन लस घेतली त्यांनाच हा त्रास झालेला आहे.

काही वृद्ध काहीही विचार न करता ‘लसीकरण’ हे कोरोना व्हायरसवरील औषध आहे असे समजून जातात. त्यांना काहीही त्रास झालेला नाही. उलट ते खूष आहेत. त्यांच्यातील सकारात्मतेमुळे त्यांना ‘कोरोना व्हायरस गेला, आता आपल्याला काहीही होणार नाही’ असेच वाटत आहे. ते तसे वाटलेलेच चांगले.

लस घ्यावी की घेऊ नये हे प्रत्येकाने वैयक्तिकपणे ठरवावे. जर मनात भीती असेल तर घेऊ नये, पण प्रत्येकाने ‘लसीकरण’ करून घेण्यास काहीच हरकत नाही. मृत्युदराचा विचार करता मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अपघात यांनी मरण पावणार्‍यांची संख्या तशी जास्तच आहे. जसे आपणाला माहीत आहे- हृदयरोग, मधुमेह इत्यादी व्याधी बर्‍या होणार नाहीत तरीसुद्धा आपण रोज गोळ्या-औषधे घेतोच ना! तसेच ‘लसी’चे आहे! लसीकरण कक्षात जावे व लस घेऊन यावे. वैद्यकीय ज्ञान नसलेल्यानी जास्त खोलात जाऊन शंका-कुशंका काढत बसू नये व दुसर्‍यांनाही भयभीत करू नये. तसेच व्हॉट्‌सऍप, फेसबुकच्या मॅसेजवर जास्त लक्ष देऊ नये.
आपले आरोग्य टिकवणे, निरोगी राखणे हे ङ्गक्त आपल्याच हाती आहे. त्यासाठी या कोरोनाच्या काळात लोकांनी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन आहार-विहारचे आचरण केले की की ही व्याधी दूर पळवायला जास्त अवधी लागणार नाही.

खबरदारीचे उपाय

  • गरज असेल तरच घराबाहेर पडावे. कामाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी घराबाहेर पडू नये.
  • मास्कचा वापर नियमित करावा.
  • हाताला सॅनिटायझर लावावे.
  • बाहेरून आल्यावर आंघोळ करावी. आपले कपडे गरम पाण्याने धुवावे.
  • चांगला आहार, योगासनांसारखा व्यायाम व चांगली झोप घ्यावी.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण करून घेतले तर प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील याकडे लक्ष द्यावे.
  • घरचे ताजे अन्न खावे.
  • आहार सहा रसांनी युक्त असावा. आहारामध्ये गोड, तिखट, आंबट, तुरट, खारट व कडू अशा सहाही रसांचे पदार्थ असावेत.
  • स्वयंपाक केल्यावर लगेच एका तासाच्या आत जेवावे असा नियम आहे. सध्या घरात आहे तर अशा प्रकारे आहार सेवन करण्यास हरकत नाही.
  • ज्या भाज्या, ङ्गळे बाहेरून गुळगुळीत, चकचकीत दिसतात त्या भाज्या वापरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यातून धुवून काढाव्यात.
  • आजाराची चिकित्सा करत बसण्यापेक्षा गरज आहे ती आजारापासून वाचण्याची. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते अन्न पचणे ङ्गार महत्त्वाचे आहे.
  • अन्न योग्य प्रकारे पचण्यासाठी ते वेळेवर सेवन करावे. सकाळचे जेवण सेवन करावे. दुपारचे जेवण सकाळच्या जेवणापेक्षा अर्धे असावे.
  • रात्री जेवल्यावर साधारण दोन तास झोपू नये. शतपावली करावी. जेवणानंतर लगेच साधारण दहा मिनिटे वज्रासनात बसावे.
  • प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीर व मन प्रसन्न असावे.
  • चहा-कॉङ्गीचा अतिरेक टाळावा.
  • चहाच्या ऐवजी तुळस, दालचीनी, मिरे, सुंठ यांचा चहा दिवसातून दोन वेळा घ्यावा.
  • पाणी पिण्यासाठी सुवर्णसिद्ध जलाचा वापर करावा.
  • सर्दीसारखी लक्षणे आढळल्यास सिनोवलादी चूर्ण घ्यावे.
  • गुडूची चांगले रसायन आहे. त्यामुळे गुडूची काढा मध्ये-मध्ये आठ दिवसांतून एकदा तरी घ्यावा.
  • ‘लसीकरणा’च्या वादात पडण्यापेक्षा प्रत्येकाने आपले आरोग्य संभाळावे.
  • लसीकरण करून घेणार्‍यांनी मनात काहीच शंका न आणता लस घ्यावी.
  • उन्हाळा असल्याने ग्रीष्मऋतुचर्येचे आचरण करावे.
  • हंगामी सगळ्या प्रकारच्या ङ्गळांचा आस्वाद घ्यावा.
  • तळलेले, तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावेत.
  • सात्विक आहार, योग्य व्यायाम व झोप या त्रिसूत्रीचे योग्य आचरण ठेवून निरोगी राहावे.