कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचा आदेश

0
169

राज्य कार्यकारी समितीचे मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील कोरोना रुग्ण वाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी इस्पितळे आणि कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन, आरोग्य खाते, पोलीस खात्याने कोविड नियमावलीच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे. नियमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोविड चाचण्यांमध्ये वाढ करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे होणारी सभागृहे, मॉल, व्यायामशाळा, उद्योग यांना कोविड नियमावलीच्या पालनासाठी आवश्यक निर्देश देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, नियमावलीच्या योग्य पालनासाठी विविध ठिकाणी आकस्मिक छापे घालून तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.