शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर राजस्थानात हल्ला

0
83

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थानात हल्ला करण्यात आला. राजस्थानातील अलवरच्या हरसौरा भागातील एका सभेला संबोधित केल्यानंतर राकेश टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्याचवेळी ततारपूर भागात त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यात गाडीच्या काचाही फुटल्या. त्यावेळी काही लोकांनी टिकैत यांच्या अंगावर शाई फेकली. यावेळी पोलिसांनी टिकैत यांना सुरक्षित बाहेर काढले. हा हल्ला भाजपकडून झाला असल्याचा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे.