‘त्या’ जीपच्या मालकाचा खाडीत मृतदेह सापडला

0
176

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या जीपच्या मालकाचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला. त्या जीपचे मालक हिरेन मनसुख हे असून त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती.

या घटनेचा तपास सुरू होता. ही जीप कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. हिरेन हे या जीपचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते. जीप चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, आता मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख हे गुरूवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते.