आरटीओशी संबंधित १८ सेवा ऑनलाइन

0
203

>> वाहन परवानाही मिळणार ऑनलाइन

आरटीओशी संबंधीत १८ सेवा आता ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे वाहन चालन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी आता आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अनेक महत्त्वपूर्ण सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत.
सरकारने चार चाकी वाहनाचे लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बूक) आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर या सर्व सेवा ऑनलाईन मिळू शकतील अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व सेवा घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाइन १८ सेवा
आधार कार्ड जोडल्यामुळे आरटीओकडून १८ सेवा ऑनलाईन होणार आहेत. त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नुतनीकरण, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लासनन्स, वाहनाच्या आरसी बूकमधील पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय चालक परवाना, परवान्यातून वाहन श्रेणी सरेंडर करणे, तात्पुरती वाहन नोंदणी, मोटर वाहनांच्या नोंदणीसाठी अर्ज अशा सेवांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे नोंदणीचे डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी अर्ज, नोंदणी प्रमाणपत्रासाठी एनओसी मंजूर करण्यासाठी अर्ज, मोटर वाहनाची मालकी हस्तांतरित करण्याची नोटीस, मोटर वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणासाठी अर्ज, पत्ता बदलण्याच्या नोटिशीतील नोंदणी प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण केंद्रावरून चालक प्रशिक्षण घेण्यासाठी नोंदणी करणे, अधिकार्‍याच्या मोटर वाहनासाठी नोंदणी अर्ज, चिन्हासाठी अर्ज, भाड्याने खरेदी करार अर्जह्या सुविधाही आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

केवळ आधारकार्ड पुरे
दरम्यान, वाहन चालवणचा परवाना काढण्यासाठी तसेच वाहन नोंदणी करण्यासाठी केवळ आधार कार्डची गरज आहे. यासाठी इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. यासाठी रिीर्ळींरहरप.र्सेीं.ळप या वेबसाईटवर जाऊन आपले आधारकार्ड व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर वरील सर्व १८ ही सुविधा उपलब्ध असून ग्राहक त्या त्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.