राष्ट्रपतींनी घेतली लस

0
105

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपतींनी नवी दिल्लीमधील आर. आर. रुग्णालयामध्ये करोनाची लस घेतली. एक मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले असून त्यानुसार तिसर्‍या टप्प्यामध्ये ७५ वर्षीय कोविंद यांनी काल लसीचा पहिला डोस घेतला.