बुधवारी कोरोनाचे नवे ७० रुग्ण

0
66

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मात्र कालही आणखी कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१० एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,१४३ एवढी झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ७९६ एवढी झाली आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ७३७ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १,७१७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.०७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन २८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. मये आणि मडकई आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.