अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

0
97

राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी काल कोसळल्या. फेब्रुवारी महिन्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने बदललेल्या हवामानामुळे हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. बदललेल्या वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पणजी, वास्को, काणकोण, बांबोळी, पर्वरी आदी अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.