Home Featured विधिकार दिनानिमित्त आज ज्येष्ठ आमदारांचा सत्कार

विधिकार दिनानिमित्त आज ज्येष्ठ आमदारांचा सत्कार

0

गोवा विधानसभा सचिवालयाने शनिवार ९ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजता विधिकार दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थितीत राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ५ ज्येष्ठ आमदारांचा सत्कार आणि ३ ज्येष्ठ आमदारांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला गोवा व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ माजी आमदार रोहिदास नाईक, एदुआर्द फालेरो, चंद्रकांत चोडणकर, डॉ. अनिल प्रभुदेसाई आणि विद्यमान ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा सत्कार केला जाणार आहे. तर माजी आमदार तियोतीन परेरा, गोपाळ मयेकर आणि गजानन रायकर यांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.