- डॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)
- डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल
सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून स्टीम इनहेलेशन, कोविड आणि श्वसन आजारांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नात घरातील सामान्य दैनंदिन प्रथा बनली आहे. तथापि मुलांसाठी योग्यरीत्या न केल्यास चटके बसतात किंवा भाजू शकते.
अवेळी पावसामुळे तापमानात चढउतार आणि कोविड-१९ विषाणूची लागण होण्याची भीती पालकांना लहान मुलांना वाफारा देण्यास प्रोत्साहित करते. मुलं अतिसंवेदनशील असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
वाफ देण्याच्या प्रयत्नात गरम पाण्यामुळे जळल्याच्या मुलांच्या घटनांमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. वाफेच्या दरम्यान गरम पाणी अंगावर उडाल्याने भाजल्याची लक्षणे असणारी ८ ते १० मुले सध्या असतात.
म्हणून असेही सांगावेसे वाटते की दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी श्वसन आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून वाफ घेण्याचे टाळले पाहिजे.
चटके, भाजणे किंवा जाळ यांच्यामुळे झालेल्या जखमा या वाफ घेण्याच्या संभाव्य फायद्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहेत.
केवळ नाक ब्लॉक, वाहणारे नाक किंवा ऍलर्जी असणारी मुलेच आवश्यक ती काळजी घेताना बालरोगतज्ज्ञांनी सल्ला दिल्याप्रमाणे वाफ घेऊ शकतात.
- मुलांची त्वचा ही अधिक नाजूक व संवेदनशील असल्याने जळण्याचा परिणाम तीव्र होऊ शकतो. दहा टक्क्यांपेक्षा जास्त ज्वलन झाल्यास किंवा त्यांचा चेहरा, हात, पाय किंवा जननेंद्रियांसारख्या संवेदनशील भागाचा समावेश असल्यास मुलाला तातडीने जवळच्या डॉक्टरकडे नेणे आवश्यक आहे. एखादे वेळेस मुलाला दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते. द्रव पदार्थाचे नुकसान झाल्यास, तीव्र जळजळीच्या पृष्ठभागावर किंवा दुय्यम संसर्गास रोखण्यासाठी सतत क्लिनिकल निरीक्षणाची आवश्यकता असते.
तसेही जाळपोळची घटना घडल्यास प्रथम मुलाला त्वरित जळण्याच्या स्रोतापासून दूर नेऊन बाधित भागावर साधे पाणी घाला. बाधित भागाला थंड नळाच्या पाण्याखाली ठेवणे चांगले. - दूथपेस्ट, ग्रीस, कॉस्मेटिक आणि औषधी क्रीम यांसारख्या पदार्थांचा वापर करणे, विशेषतः फोड किंवा त्वचेचे नुकसान होण्याच्या बाबतीत सूचविले जात नाही कारण त्यामुळे जखमेची काळजी घेण्याच अडथळा येऊ शकतो.
- जर मुलाला वेदना तीव्र स्वरुपाची असेल तर पॅरासिटामॉल सिरप मुलाची वेदना कमी करू शकते.
- उष्णता किंवा गरम द्रव शरीरावर पडल्यास फोड येणे हा नैसर्गिक प्रतिसाद आहे. जळणे किंवा भाजणे सहसा मुलांमध्ये कोणताही डाग किंवा घाव न ठेवता बरे होतात.
वाफ देण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही मुलांना चटके लागतात किंवा भाजू शकते. त्यासाठी… - स्टीमर मुलाला सोयीच्या उंचीवर मुलाच्या जवळ ठेवा. स्टीमर बघून वाफ घ्या. व्यावसायिक इलेक्ट्रिक स्टीमर वापरा कारण त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे पाणी सांडण्याचा धोका कमी असतो आणि त्यामुळे मुलांकरिता वापरण्यास सोयीचे ठरते.