मुंबईत महायुतीपैकी शिवसेनेला ७६. भाजपला ३२, रिपाईला १ जागा मिळाली होती. कॉंग्रेसला ५०तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४ जागा व इतरांना २७ जागा प्राप्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्राबल्य २००७च्या तुलनेत चौपट वाढले असून त्यांना २८ जागा मिळाल्या आहेत.
पुण्यात १५२ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत कॉंग्रेसला २७, राष्ट्रवादीला ५१, शिवसेनेला १७, भाजपला २७, मनसेला २९ व अन्य १ निवडून आला आहे.
ठाण्यात १३० जागांपैकी सेनेला ५४, भाजपला ८, कॉंग्रेसला १८, राष्ट्रवादीला ३४ मनसेला ७ व इतरांना १० जागा मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये ११२ जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ४०, सेनेला २२, भाजपला १३, राष्ट्रवादीला २१, कॉंग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत. नागपूरच्या १४५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपला ६२, सेनेला ६, कॉंग्रेसला ४१, राष्ट्रवादीला ६, मनसेला २ जागा मिळाल्या आहेत. उल्हासनगरला शिवसेनेला तर अमरावती, सोलापूर व अकोल्यात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळा-राष्ट्रवादीने सत्ता संपादीत केली आहे तर पिंपरी चिचवडमध्ये राष्ट्रवादीने पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे.
बाळासाहेबांच्या करिष्म्याचा प्रभाव
मुंबईत, ठाण्यात आणि नागपूरमध्ये महायुती केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळेच सत्ता राखू शकली असे भाजपने म्हटले आहे. लोकांपर्यंत जाण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी असमर्थ ठरल्याचे मत भाजप प्रवक्ते गणेश जावडेकर यांनी व्यक्त केले.