ट्राय गोवा’ने घोषित केला बीआरएम सायक्लिंग मोसम

0
117

>> २२ नोव्हेंबरला होणार १०० आणि २०० किमीच्या सायकल राईड

ट्राय गोवा फाऊंडेशनने २०२०-२१ च्या ब्रिवेट्स रँडोनुअर मॉंडीऑक्स (बीआरएम) मोसम घोषित केला असून त्याची सुरुवात येत्या रविवार २२ नोव्हेंबर रोजी १०० आणि २०० किमीच्या इंडयुरन्स सायकल राईड्सने होणार आहे.

काल सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ट्राय गोवा फाऊंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा म्हणाले की, २०० किमीची सायकल राईड ही ट्राय गोवा कोस्टलाईन बीआरएम म्हणून ओळखली जाते. ही राईड पणजी येथून स. ६ वाजता सुरू होईल. सायकलिस्ट दक्षिण गोव्याच्या सुंदर समुद्रकिनार्‍यांवरून कोलवा, बाणवली, अगोंद, पाळोळे आणि पोळे या मार्गावरून सायकलिंग करतील. आम्ही सर्व सायकलिस्टसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे. २०० किमीची सायकल राईड पूर्ण करण्यासाठी सायकलिस्टना १३ तास ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. याशिवाय राईड पूर्ण करणार्‍या सर्वांना फ्रान्स मधील विशेष मेडल देण्यात येणार आहे.

मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्राय गोवा हे ऑडाक्स इंडिया रँडोनुअरशी (एआयआर) संलग्नित असून ऑडाक्स क्लब परिसिएन, फ्रान्स (एसीपी) यांच्या वतीने लांब पल्ल्याच्या इंडयुरन्स राईड (बीआरएम) आयोजित करते. मल्होत्रा पुढे म्हणाले की, रँडोनुअरआणि सुपर रँडोनुअर हा दर्जा आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो तसेच याला जगभरात सर्वत्र मान्यता दिली जाते. देशभरात १५ हजार रँडोनुअर आहेत. याच दिवशी ट्राय गोवा तर्फे १०० किमीच्या ब्रिव्हेट पॉप्युलेयरचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याविषयी बोलताना मल्होत्रा म्हणाले की नवीन रायडर्सना स्वयंपूर्ण बीआरएम राईड्सचा अनुभव मिळवा यासाठी या राईडचे आयोजन करण्यात आले आहे. राईड पूर्ण करणार्‍या सर्व रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनुअरतर्फे मेडल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

१०० किमीची सायकल राईड पणजी येथून सकाळी ६.१५ ला सुरू होईल. ही राईड बांबोळी, कुठ्‌ठाळी, दाबोळी, माजोर्डा, बेतालबाटी, मडगाव, बोरी, लोटली, ओल्ड गोवा-पणजी या मार्गावरून जाईल. १०० किमीची राईड पूर्ण करण्यासाठी ७ तास ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. इच्छुकांनी २० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत २०० किमीसाठी हींींिी://ुुु.र्रीवरुळपवळर.ळप/र्शींशपीं-श-४५६३ आणि १०० किमीसाठी हींींिी://ुुु.र्रीवरुळपवळर.ळप/र्शींशपीं-श-४७७१, किंवा ींीळसेरीरपवेपपर्शीीीसारळश्र.लेा वा राजेश (७४४७७-२४७४४) यांच्याशी व्हॉट्‌सऍपवर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.