बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाल्यानंतर आता नव्या सरकारची स्थापना दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याच्या विक्रमाकडे वाटचाल करणारे नितीशकुमार पुढील आठवड्यात सोमवारी १६ नोव्हेंबर किंवा त्यानंतर शपथ ग्रहण करण्याची शक्यता आहे.
या पूर्वीच्या सरकारचा नोव्हेंबरअखेरीस कार्यकाल समाप्त होत आहे. बिहारमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम श्रीकृष्ण सिंह यांच्या नावे आहे. ते या पदावर १७ वर्षे ५२ दिवस राहिले. नितीशकुमार या पदावर १४ वर्षे ८२ दिवस राहिले आहेत.