फॉर्म्युला वनचे भरगच्च वेळापत्रक

0
244

फॉर्म्युला वनच्या आयोजकांनी आगामी २०२१ मोसमासाठी २३ शर्यतींचा समावेश असलेल्या जंबो वेळापत्रकाची घोषणा काल मंगळवारी केली. मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीद्वारे नवीन मोसमाला १९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

३ ते ५ डिसेंबर या कालावधीतील अबुधाबी ग्रांप्री ही मोसमातील अखेरची शर्यत असेल. मोसमातील चौथ्या रेसचे यजमानपद व्हिएतनामला देण्यात आले होते. परंतु, आयोजकांच्या असमर्थतेमुळे या रेेेेसचे ठिकाण जाहीर करण्यात आलेले नाही.

फॉर्म्युला वन २०२१ वेळापत्रकः रेस १ ः १९-२१ मार्च, मेलबर्न ऑस्ट्रेलिया, रेस २ ः २६-२८ मार्च, साकिर बहारिन, रेस ३ ः ९-११ एप्रिल, शांघाय चीन, रेस ४ ः २३-२५ एप्रिल, ठिकाण निश्‍चित नाही, रेस ५ः ७-९ मे ः बार्सिलोना स्पेन, रेस ६ ः २०-२३ मे मोनॅको, रेस ७ ः ४-६ जून, बाकू अझरबैजान, रेस ८ ः ११-१३ जून, मॉंटरियल कॅनडा, रेस ९ ः २५-२७ जून, ला कॅसलेट फ्रान्स, रेस १० ः २-४ जुलै ः स्पीलबर्ग ऑस्ट्रिया, रेस ११ ः १६-१८ जुलै ः सिल्वरस्टोन युनायटेड किंग्डम, रेस १२ ः ३० जुलै-१ ऑगस्ट, बुडापेस्ट हंगेरी, रेस १३ ः २७-२९ ऑगस्ट, स्पा बेल्जियम, रेस १४ ः ३-५ सप्टेंबर, झेंडवूर्ट नेदरलँड्‌स, रेस १५ ः १०-१२ सप्टेंबर, मोंझा इटली,

रेस १६ ः २४-२६ सप्टेंबर, सोची रशिया, रेस १७ ः १-३ ऑक्टोबर, सिंगापूर, रेस १८ ः ८-१० ऑक्टोबर, सुझूका जपान, रेस १९ ः २२-२४ ऑक्टोबर, ऑस्टिन अमेरिका, रेस २० ः २९-३१ ऑक्टोबर, मेक्सिको सिटी मेक्सिको, रेस २१ ः १२-१४ नोव्हेंबर, सा पावलो ब्राझिल, रेस २२ ः २६-२८ नोव्हेंबर, जेड्डा सौदी अरेबिया, रेस २३ ः ३-५ डिसेंबर अबुधाबी.