वीज जोडणीचे अर्ज आता ऑनलाइन

0
92

>> पणजीत १६ पासून प्रारंभ, वीजमंत्र्यांची माहिती

वीज जोडणीसाठी अर्जदारांकडून लाच घेण्याचे प्रकार थांबवण्यासाठी आता विजेसाठीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याचा वीज खात्याचा प्रस्ताव असून त्याची सुरूवात राजधानी पणजीपासून करण्यात येणार आहे. पणजीत या योजनेचा येत्या १६ नोव्हेंबर शुभारंभ करण्यात येणार असल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेमुळे वीजजोडणी मिळवणे सोपे होणार असल्याचे काब्राल म्हणाले.

आपणाला वीज जोडणी झटपट मिळावी यासाठी काही अर्जदार स्वत: होऊन वीज खात्यातील अभियंत्यांना लाच देऊ करतात. लाच देण्याची व घेण्याची ही अनिष्ट गोष्ट बंद होण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच कालांतराने सर्व गोवाभरात वीज जोडणीसाठीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. एकदा ही ऑनलाइन पद्धत सुरू केली की कोणत्याही अर्जदाराला आपली वीज जोडणीसाठीची फाईल घेऊन कार्यालयात जावे लागणार नसल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले.

तपासणीसाठीही अर्जदार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ ठरवू शकेल. त्यासाठीचे स्वातंत्र्य त्याला देण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी नमूद केले.

विवाह नोंदणीही ऑनलाईन
विवाह नोंदणीसाठीची सोयही ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचे काब्राल म्हणाले. एकदा अर्ज ऑनलाइन पाठवला की वाग्दत्त वधू व वर यांना नोंदणीसाठी स्वत:च्या सोयीनुसार तारीख घेता येणार असल्याचे ते म्हणाले.

थकित बिलांसाठी १ पासून एकरकमी परतफेड योजना
वीज ग्राहकांना त्यांच्या थकित बिलांचा भरणा करता यावा यासाठी वीजखात्याने त्यांच्यासाठी १ डिसेंबरपासून एकरकमी परतफेड योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना केवळ एक महिन्यासाठी असेल अशी माहिती वीजमंत्री काब्राल यांनी दिली. दि. १३ ऑक्टोबर २०२० पर्यंतच्या भरणा केलेल्या वीज बिलांवर वरील योजनेखाली ग्राहकांना उशिरा भरल्या जाणार्‍या बिलांवर जे अतिरिक्त पैसे भरावे लागतात ते अंशतः अथवा पूर्णपणे