गोवा सरकारने गोवा नागरी सेवेतील सात अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काल काढले. यात पर्यावरण संचालकपदी दशरथ रेडकर यांची, जॉन्सन फर्नांडिस यांची तंटा निवारण व जमीन दस्ताऐवज संचालकपदी, संतोष कुंडईकर यांची गोवा पुनर्वसन मंडळाच्या सचिवपदी, सुषमा कामत यांची राज्य लॉटरी संचालकपदी, अरविंद खुटकर यांची सहकारी सोसायटींचे निबंधक, बिजू नाईक यांची सर्वसामान्य प्रशासन खात्याच्या संयुक्त संचालकपदी तर गौरीश कुट्टीकर यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी दक्षिण गोवा (३) फोंडा येथे बदली करण्यात आली आहे. संजीवनी साखर कारखान्याचे प्रशासक संजीव गडकर यांना मोप विमानतळासंबंधीचे विशेष जमीन संपादन अधिकारी म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
डीआरडीए दक्षिणच्या प्रकल्प संचालक मीना नाईक गोलतेकर यांच्याकडे गोवा अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ तसेच गोवा राज्य मागास वर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.