>> कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील घटना
काल मंगळवारी दुपारी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीतील योगेश राजकुमार शर्मा हा उत्तर प्रदेशमधील कामगार कंपनीतील मशीनमध्ये सापडल्याने ठार झाला. ही घटना काल दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.
कुंकळ्ळीतील सदर कंपनीतील मशीनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्या मशीनवर काम करत असताना त्याखाली सापडून कामगार योगेश हा चिरडला गेला व त्याचा मृत्यू झाला. या घटनेची पाहणी संध्याकाळी कारखाना आणि बाष्पक विभागाच्या अधिकार्यांनी केली.