>> एनसीबीद्वारे मुंबईत आज व उद्या होणार चौकशी
अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान व दीपिका पदुकोण ह्या काल गोव्यातून मुंबईला रवाना झाल्या.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युप्रकरणी तपासकाम करणार्या एनसीबीने दीपिका पदुकोण व सारा अली खान ह्यांना चौकशीसाठी पाचारण केले. काही दिवसांपासून या दोन्ही अभिनेत्री गोव्यात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आहेत. मात्र एसीबीने समन्स जारी केल्याने काल त्यांनी गुरुवारी दाबोळी विमानतळावरून मुंबई जाण्यासाठी प्रयाण केले.
दीपिका व सारा गेल्या दोन आठवड्यापासून गोव्यात चित्रीकरण करण्यास आल्या होत्या. पण एनसीबीने समन्स बजावल्याने सारा ही काल दुपारी तर दीपिका काल संध्याकाळी विमानाने मुंबईला निघून गेल्या. दीपिकाला आज शुक्रवारी तर सारा हिला उद्या शनिवारी एनसीबीसमोर हजर राहण्याचा आदेश जारी केला आहे.
दीपिकाला पोलीस बंदोबस्त
दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण कांदोळी येथील पंचतारांकित हॉटेलमधून कारने मुंबईकडे रवाना झाली अशा बातम्या ऐकायला येत होत्या. मात्र निश्चित काहीच सांगितले जात नव्हते. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत तिचा गोव्यातच मुक्काम होता. नंतर रात्री आठ वाजता तिचे पती रणवीर सोबत दाबोळी विमानतळावर कडक पहार्यात आगमन झाले. यावेळी दाबोळी विमानतळावर कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. तसेच यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.