पुन्हा ८ जणांचा मृत्यू, ५९६ बाधित

0
254

>> मृतांमध्ये दोन युवक, एक युवती

राज्यात गेल्या चोवीस कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ३७९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५७३० तर, कोरोना बळींची संख्या ३३५ एवढी झाली आहे.

गोमेकॉमध्ये चार तर मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात ६८ वर्षांची महिला आणि ९७ वर्षांच्या पुरुष रुग्णाला १७ सप्टेंबरला मृतावस्थेत आणण्यात आले होते.

दोन युवक, युवतीचा मृत्यू
वाळपई सत्तरी येथील एका ३० वर्षांच्या युवकाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर दोन तासांत मृत्यू झाला. नावेली-सासष्टी येथील ३० वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. या युवकाला १५ सप्टेंबरला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. केरी – सत्तरी येथील २८ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले. साखळी येथील ५१ वर्षांचा पुरुष रुग्ण, बांदोडा-फोंडा येथील ४८ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. कारवार-कर्नाटक येथील एका ६० वर्षांच्या महिला रुग्णाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर सात तासांत मृत्यू झाला.

४७० जण कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४७० रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१ हजार ३१४ एवढी झाली आहे.

पणजीत ५
दिवसांत १५१ रुग्ण

पणजी परिसरात मागील पाच दिवसांत १५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नवे ३२ कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून पणजीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३३९ एवढी झाली आहे.