एम्स इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांना काल डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एम्समध्ये दाखल केले होते. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्यावर त्यांना दि. ३१ ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.