कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला इस्लमाबाद उच्च न्यायालयानेच धक्का दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी, असे न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून या अगोदर भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार दिला होता. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. या अगोदर कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती.