पॅट्रियोटस्, जमैका तलावाहाज्‌चे विजय

0
116

कॅरेबियन प्रीमयर लीग टी-२० सेंट किट्‌स अँड नेव्हिस पॅट्रियोटस् आणि जमैका तलावाहाज् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत मंगळवारी झालेल्या लढतींमध्ये पूर्ण गुणांची कमाई केली.
मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌‌ संघाने बार्बोडोस ट्रायडंटस् संघावर ६ गड्यांनी मात करीत कॅरेबियन पूर्ण गुणांची कमाई केली.

मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌‌ संघाने बार्बोडोस ट्रायडंटस् संघावर ६ गड्यांनी मात करीत कॅरेबियन प्रीमियर लीगमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना बार्बोडोस, ट्रायडंटस्‌ने ७ गड्यांच्या मोबदल्यात १५१ अशी धावसंख्या उभारली. कोरी अँडरसनने ३१, शाय होपने २९, ऍश्‍ली नर्सेने २५, जॉनसन चार्ल्सने २४ तर कायल मेयर्सने २२ धावा जोडल्या. पॅट्रियोटस्‌‌‌कडून जॉन-रुस जॅगेसरने २ तर सोहेन तन्विर, अल्जारी जोसेफ, रेयाद इम्रित आणि इमरान खानने प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर इविन लेविसने ६ षटकारांचा पाऊस पाडत ६० चेंडूंत नोंदविलेल्या तडाखेबंद ८९ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पॅट्रियटस्‌ने १९.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. लेविसच्या अर्धशतका व्यतिरिक्त बेन ड्रंक (नाबाद २२), दिनेश रामदीन (२०) आणि ख्रिस लिन (१६) यांनी उपयुक्त योगदान दिले. बार्बोडोसकडून कायल मेयर्सने २ तर जेसन होल्डर व राशिद खान यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या दुसर्‍या लढतीत जमैका तलावाहाज्‌ने गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघावर ५ गडी राखून मात केली.