गोलंदाजीत अँडरसनची झेप

0
133

>> वनडे फलंदाजीत विराटचे अव्वल स्थान कायम

इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध साऊथहॅम्टनमध्ये झालेली तिसरी कसोटी लढत अनिर्णीत अवस्थेप संपली. या कसोटीत केलेल्या सरस कामगिरीमुळे त्याने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेताना अव्वल दहात स्थान मिळविले आहे. १३व्या स्थानावरून तो अव्वल दहात ८व्या स्थानी पोहोचला आहे. याच कसोटीत अँडसरनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी पाठवत ६०० बळींचा टप्पाही गाठलेला आहे. या व्यरिरिक्त अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत कोणताही बदल झालेला नाही.

अव्वल दहात भारताचा जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे. तो नवव्या क्रमावर कायम राहिला. ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज पॅट कमिन्सने आपले पहिले स्थान राखले आहे. दुसर्‍या स्थानागवर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड तर तिसर्‍या स्थानी न्यूझीलंडचा नील वॅग्नर आहे. कसोटी फलंदाजीत भारताच्या चेतेश्वर पुजारला सातव्या स्थानी पोहोचला आहे. बेन स्टोक्स स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे क्रमवारीत एका स्थानाने खाली घसरला असून तो नवव्या स्थानी घसरला. भारताचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या स्थानी आहे. अजिंक्य राहाणे दहाव्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी कायम आहे.

वनडे क्रमवारीत विराटने आपले अव्वल स्थान राखले आहे. दुसर्‍या स्थानी उपकर्णधार रोहित शर्मा कायम आहे. बाबर आझम तिसर्‍या तर रॉस टेलरन चौथ्या स्थानी आहे.