Home Featured कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू

0

>> राज्यात एकूण बळींची संख्या १२४

कालच्या एकाच दिवशी राज्यात ८ कोरोना रुग्णांचे निधन झाले. त्यात म्हापसा येथील एका ६२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक, चिंबल येथील एका ५२ वर्षांचा पुरुष, शिरोडा येथील एक ७४ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक बेती येथील एक ६८ वर्षांची महिला, फोंडा तळावली येथील एक ८१ वर्षांचे वयोवृद्ध यांना अन्य आजार असल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेताना त्यांचे निधन झाले. मात्र, म्हापसा येथील ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे गोमेकॉत आणण्यापूर्वीच निधन झाले होते.

अन्य मृतांमध्ये अन्य दोघा जणांचा समावेश असून त्यापैकी एक ६२ वर्षीय घोगळ मडगाव व अन्य एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. अन्य आजार असलेल्या या कोरोना रुग्णांना मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्याशिवाय काल कोविड इस्पितळात अन्य एका कोरोना रुग्णाचे निधन झाले. मात्र, त्याची ओळख पटू न शकल्याने तो कुठला व त्याचे वय काय हे कळू शकले नाही.

३४२ पॉझिटिव्ह रुग्ण
दरम्यान, बुधवारी राज्यभरात ३४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा हा ३५७ एवढा होता. काल २३६४ एवढे अहवाल हाती आले असून घरी विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा हा २२७ एवढा आहे.