काल प्रदेश भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मांद्रेतून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व कुठ्ठाळी मतदारसंघातून पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. वरील दोन्ही मतदारसंघांसाठी आणखी कुणाचेही नाव चर्चेत नव्हते.
अन्य म्हणजे डिचोली, वास्को, सांत आंद्रे, काणकोण या मतदारसंघासाठी एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने या मतदारसंघातील उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ३७ मतदारसंघातील उमेदवार निवडीची प्रक्रिया १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती रविवारी पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते सदानंद शेट तानावडे यांनी दिली होती. बर्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने सर्व इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची उत्सुकता ताणली गेल्याचे दिसत आहे.