काल वेगवेगळ्या मतदारसंघातून २६ जणांनी निवडणूक उमेदवारी अर्ज सादर केले असून त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या ७७ झाली आहे. काल अर्ज भरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये आग्नेल फर्नांडिस (कॉंग्रेस- कळंगुट), पांडुरंग मडकईकर (कॉं- कुंभारजुवे), सुभाष शिरोडकर (कॉं. शिरोडा), वालंका आलेमाव (कॉं. बाणावली), चर्चिल आलेमाव (कॉं. नावेली),
ज्योकी आलेमाव (कॉं. कुंकळ्ळी), निलेश काब्राल (भाजप- कुडचडे), युरी आलेमाव (राष्ट्रवादी- सांगे), सुभाष फळदेसाई (भाजप- सांगे), दीपक प्रभू पावसकर (अपक्ष- सावर्डे), प्रवीण झांट्ये (अपक्ष- मये) यांचा समावेश आहे.