पर्वरी येथील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या एका विद्यार्थिनीने शनिवारी रात्री उशिरा गळङ्गास घेऊन आत्महत्त्या केली. मूळ मुंबई येथील आणि सध्या पर्वरीतील एका बंगल्यात पेईंग गेस्ट म्हणून राहणार्या अमिषा सुनील सीरिया (२०) या युवतीने गळङ्गास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार तिच्या सहसोबतीणीच्या निदर्शनास आले. हा प्रकार तिने त्वरित घरमालकाला हा प्रकार सांगितला आणि घरमालकाने पर्वरी पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. आमिषाने आत्महत्येच्यावेळी पालकांना चिट्ठी लिहून ठेवली होती. अमिषा ही हॉटेल मॅनेजमेंट इंस्टीट्युटमध्ये एक हुशार म्हणून गणली जायची, ती दुसर्या वर्षात आपले शिक्षण घेत होती. दरम्यान तिने ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंटर्नशिप घेत असल्याचे कळते. काल रविवारी (दि.१८) पालकांनी मृतदेह मुंबईला नेला.