Home बातम्या मुख्यमंत्री कामत आज उमेदवारी भरणार

मुख्यमंत्री कामत आज उमेदवारी भरणार

0

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री दिगंबर कामत मडगाव मतदार संघातून आज गुरुवार दि. ९ रोजी सकाळी ११ वा. निर्वाचन अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, कामत यांनी सध्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला असून कोपरा बैठकाही आयोजित केल्या जात आहेत. त्यांच्या प्रचाराची पहिली फेरी अंतिम टप्प्यात आहे.