Home बातम्या ‘अनुसूचित लोकसंख्येनुसार राखीवता का नाही?’

‘अनुसूचित लोकसंख्येनुसार राखीवता का नाही?’

0

अनुसूचित जमातींना विधानसभेत १२ टक्के आरक्षण या तत्त्वानुसार त्यांच्यासाठी ५ मतदारसंघ आरक्षित करण्यात यायला हवे होते, असे विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मात्र, हे मतदारसंघ आरक्षित करण्यासाठी कुठल्या मतदारसंघात अनुसूचित जमातींतील लोकांची संख्या मोठी आहे हे जाणून घेण्यासाठी गणना करण्याची गरज होती. मात्र, राज्यातील सरकारला अनुसूचित जमातींतील लोकांना हे आरक्षण द्यायचे नसल्यानेच त्यांनी ही गणना केली नसल्याचा आरोप मनोहर पर्रीकर यांनी केला.

अनुसूचित जमातींसाठी जर ५ मतदारसंघ आरक्षित करायचे झाले, तर त्या लोकांची जास्त संख्या असलेले ५ मतदारसंघ शोधून काढावे लागतील. त्याचसाठी त्या लोकांची गणना होण्याची गरज होती. मात्र, जाणूनबुजून राज्य सरकारने ही गणना केली नसल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. अनुसूचित जमातींतील लोकांना सरकारी नोकर्‍या दिगंबर सरकारने दिल्या नसल्याचाही आरोप मनोहर पर्रीकर यांनी केला.

‘मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरेल’

भाजपचा राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार कोण असा प्रश्‍न पत्रकारांनी वेंकय्या नायडू यांना केला असता पक्ष जेव्हा आपला जाहीरनामा जाहीर करील, तेव्हाच मुख्यमंत्री पदासाठीचा उमेदवारही जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, याआधी केंद्रीय नेते अरुण जेटली यांनीही मुख्यमंत्री ठरला नसल्याचे विधान केले होते.