एल्विस गोम्स यांची चौकशी होणार : मुख्यमंत्री

0
98

तुरुंग आयुक्त एल्विस गोम्स यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहिती वर्तमान पत्रांतून कळली. त्यांच्याविरुध्द नोंद झालेल्या गुन्ह्यांची चौकशी होईल. ते प्रकरण आपल्या सरकारच्या काळातील नाही. एखाद्या अधिकार्‍या विरुध्द गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीस मान्यता देणे शक्य नसते, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल एका प्रश्‍नावर सांगितले.

गोम्स हे कार्यक्षम अधिकारी असून त्यांच्याकडे दिलेले सर्व प्रकल्प त्यांनी उत्तमरित्या पूर्ण केले आहेत, असेही पार्सेकर म्हणाले. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गोम्स यांचा गृहनिर्माण मंडळाच्या गैरव्यवहारात संबंध नसल्याचे निधान केले आहे. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देण्याचे पार्सेकर यांनी टाळले.