प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांनी काल कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.
कदंब महामंडळ हे सरकारने आपत्कालीन म्हणून जाहीर करावे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे. महामंडळाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले. परंतु ते फायद्यात येऊ शकत नाही.
त्यामुळेच सरकारने आपत्कालीन सेवा देणारी संस्था म्हणून जाहीर करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर लवकरच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.