ज्येष्ठ पत्रकार, आऊटलूक नियतकालिकाचे संपादकीय चेअरमन विनोद मेहता यांचे काल प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मेहता यांच्यावर ‘एम्स’ इस्पितळात उपचार चालू होते. फुफ्फुसांच्या तीव्र संसर्गाने ते आजारी होते. २०११ साली प्रकाशित झालेले त्यांचे ‘लखनौ बॉय’ हे आत्मचरित्रपट पुस्तक गाजले होते. अलीकडेच त्यांचे ‘एडिटर अन प्लग्ड’ हे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले होते. मात्र त्या प्रकाशन समारंभास आजारपणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. रावळपिंडी (सध्याच्या पाकिस्तानमधील) येथे जन्मलेल्या मेहता यांनी संडे ऑब्जर्व्हर, इंडियन पोस्ट, द इंडिपेंडट यासारखी अनेक वर्तमानपत्रे काढली. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.