मोदींचे चीनमध्ये होणार जोरदार स्वागत

0
102

चीनी विदेश मंत्र्यांचे सुतोवाच
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनमध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी सांगितले. शिष्टाचार ही चीनची संस्कृती असून चीनी नागरिक व सरकार मोदी यांचे जोरदार स्वागत करेल असे यी यांनी म्हटले आहे.गेल्या सप्टेंबरमध्ये चीनी अध्यक्ष शी जीनपिंग भारत दौर्‍यावर आले होते त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत झाले होते. त्या दौर्‍या दरम्यान चरखा चालवताना गुजारतमधील जीनपिंग व मोदी यांच्या छायाचित्रामुळे चीनमध्ये सकारात्मक चर्चा झाली असे वांग यी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू वर्षा अखेरीस चीन दौर्‍यावर येणार असल्याचे यी यांनी सांगितले. वांग यी चीनमधील एका राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.