Home बातम्या कारच्या धडकेने पणजीत १६ दुचाक्यांची हानी

कारच्या धडकेने पणजीत १६ दुचाक्यांची हानी

0
कारच्या धडकेने पणजीत १६ दुचाक्यांची हानी
अपघातानंतर अग्निशामक दलाने पोलिसांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केले. (छाया : नंदेश कांबळी)

कदंब स्थानकावर अपघात; एक गंभीर
काल दुपारी ३ च्या सुमारास कदंब बसस्थानकावरील सर्कल जवळ पर्वरीहून सुसाट आलेल्या जीए ६ डी ३७६९ क्रमांकाच्या फोर्ड इंडेव्हर गाडीने धडक दिल्याने तेथे पार्क केलेल्या १६ दुचाक्यांची हानी झाली तर तेथे आपली दुचाकी घेऊन उभा असलेला नागेश हेदे हा गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथील इस्पितळात नेण्यात आले आहे.वरील अपघात होताच तेथे लोकांची प्रचंड गर्दी झाली. बराच वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कार चालकाची चौकशी चालू आहे. या अपघातात जीए ०३ एस ९५७२ स्कूटर व जीए ०८ वाय १०१२ क्रमांकाच्या मोटर सायकलची जास्त नुकसानी झाली आहे. वरील सोळाही दुचाक्या तेथे पार्क केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.