पणजी-पेडणे मार्गावरील कामरखाजन-म्हापसा येथील इंटरनॅशनल हॉटेल जवळील हमरस्त्यावर काल दुपारी ३.३० वाजता १ चार चाकी वाहन व २ दुचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात संतोषी पाटयेकर (२२) पाटयेवाडा-दोडामार्ग या युवतीचा पाय फ्रॅक्चर झाला तर सचिन सखाराम जाधव (२६) हा किरकोळ जखमी झाला. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०३ पी १६७५ इयॉन हुंडाई ही गाडी कोलवाळहून पणजीकडे जात होती; तर जीए ०३ सी ९५०७ ही हिरो होंडा मोटारसायकल व जीए ०३ एस ५२२४ ही ऍक्टीव्हा या दुचाक्या पणजीहून कोलवाळकडे जात असताना ही वाहने एकमेकांना बाजू देण्याच्या प्रयत्नात असताना तिन्ही वाहनांमध्ये विचित्र अपघात घडला. जखमी झालेले दोघेही हिरोहोंडा मोटारसायकलवरील चालक व स्वार आहेत. पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला.