कुंकळ्ळी पालिकेचे नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस यांच्यावर आणलेला अविश्वासाचा ठराव ५-५ अशी समान मते पडल्याने बारगळा. सहा नगरसेवकांपैकी एका महिला नगरसेवकाने ठरावाच्या विरोधात मतदान केल्याने नगराध्यक्षांना जीवदान मिळाले.गेल्या दि. २७ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावावर चर्चा व्हायची होती; पण निर्वाचन अधिकार्यानी ती बैठक पुढे ढकलली होती. त्या ठरावावर चर्चा झाली. मास्कारेन्हस यांच्या विरोधात उपनगराध्यक्ष प्रेमदीप देसाई, मंगलदास गावकर, नागेश चितारी, पॉलिता कॉर्नेरो, क्रॉसी फर्नांडिस व माजी नगराध्यक्ष देवेंद्र देसाई यांनी सह्या केल्या होत्या. काल ठराव चर्चेस येताच सत्ताधारी गटाचे पाचजण तसेच ठरावावर सही केलेल्या क्रॉसी फर्नांडिस अनुपस्थित राहिल्या. ती सत्ताधारी गटाला मिळाल्याने ठराव बारगळला. माजी मंत्र्याने केलेल्या शिष्टाईमुळे हा ठराव बारगळल्याचे सूत्रांनी सांगितले.