दिल्लीत कॉंग्रेस संघटनेतील वातावरण बिघडलेले असल्याने सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात तसेच कुठ्ठाळीचे माविन गुदिन्हो यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा विषय घेऊन प्रदेश कॉंग्रेस नेते दिल्लीला गेले होते. परंतु केंद्रीय नेत्यांशी या विषयावर चर्चा करणे त्यांना शक्य न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या पणजी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोन्सेर्रात यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. तर गुदिन्हो सुरुवातीपासूनच आपल्या पक्षाच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे या दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रदेश कॉंग्रेसने जाहीर केले होते. परंतु अद्याप वरील दोन्ही कॉंग्रेस आमदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.