राज्यभर ख्रिसमसची लगबग

0
159

ख्रिसमस अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने राज्यभर ख्रिसमसची लगबग सुरू आहे. या सणासाठी बाजारपेठा ङ्गुलल्या अअसून पर्यटकांसाठी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. गोव्यात ख्रिसमसची धूम काही औरच असते. गोवेकरांच्या या लाडक्या उत्सवाला दोनच दिवस बाकी असल्याने एरवी सुशेगात असलेल्या गोव्याच्या आयुष्याला आता वेग आला आहे. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को येथील प्रमुख बाजारपेठांमध्ये ख्रिसमसच्या तयारीची खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. विविध प्रकारचे स्ट्रीमर्स, रिंग्ज, वेल, बेल्ट, स्टार, ड्रम्स, क्रीप्स, मेटालिक बॉल्स आणि सजावटीच्या अनेक वस्तूंनी बाजारपेठा ङ्गुलल्या आहेत.