सुरेंद्र फुर्तादो कॉंग्रेसचे उमेदवार

0
79

पणजी मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या नावास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी दिली.सांताक्रूझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी काल महापालिकेच्या कचर्‍याच्या प्रश्‍नावर महापौर फुर्तादो यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे पोट निवडणुकीत मोन्सेर्रात यांचा फुर्तादो यांना पाठिंबा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.