भाजपचा छुपा अजेंडा उघड : लुईझिन

0
90

धर्मांतराच्या प्रश्‍नावर भाजपचा छुपा अजेंडा आता उघड झाला असून गेल्या निवडणुकीत ज्या मतदारांनी त्यांना मते दिली होती, त्यांच्यावर पश्‍चाताप करण्याची पाळी आली आहे. भाजमध्ये असलेल्या ख्रिश्ती बांधवांनाही सर्वकाही कळून चुकले आहे. त्यांना या प्रश्‍नावर गंभीर विचार करावा, असे आवाहन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल केले. फोडाफोडीच्या भाजप नेत्यांच्या राजकारणामुळे सर्वधर्म समभावाच्या तत्वाला सुरुंग लागण्याची स्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले.