भंडारी समाजाची आज पर्वरीत बैठक

0
92

गोमंतक भंडारी समाजाची खास बैठक रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. पर्वरी येथील आझाद भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.बैठकीत सरकारने केलेल्या कूळ व मुंडकार दुरुस्ती विधेयकाच्या विरुद्ध चळवळ, वधू – वर मेळावा व समाजाचे सर्व्हेक्षण या विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात येईलपूर्वी घोषित केलेली वरील बैठक ही पणजी येथील कला व सांस्कृतिक सभागृहात आयोजित केली होती. परंतु ऐन वेळी हा सभागृह देण्यास नकार दिल्याने बैठक त्याच दिवशी व त्याच वेळी पर्वरी येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बदललेल्या जागेची नोंद भंडारी समितीच्या सर्व सदस्यांनी घ्यावी. बैठकीत गोव्यातील केंद्रीय, तालुका, महिला, युवा व ग्रामसमितीच्या सदस्यांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन समाजाचे मुख्य कार्यवाह उपेंद्र गावकर यांनी केले आहे.