‘किस ऑफ लव्ह’ला परवानगी नाकारली

0
81

‘किस ऑफ लव्ह’ या चुंबन समर्थकांच्या निदर्शकांच्या बेंगलोर येथील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आज नियोजित असलेला हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आदेश मोडून कार्यक्रम करूच असा पवित्रा याआधी आयोजकांनी घेतला होता. सार्वजनिकरित्या चुंबनाचा कार्यक्रम आयोजित करू न देणे हा मूलभूत अधिकारांचा भंग असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.