शेकडोंच्या हत्येप्रकरणी होस्नी मुबारक निर्दोष

0
91

२०११ साली इजिप्तमध्ये शेकडो निशस्त्र निदर्शकांची हत्या केल्याच्या आरोपातून पदच्यूत राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची सुटका करण्यात आली. २०११मधील इजिप्तच्या क्रांतिनंतर मुबारक यांची सुमारे तीन दशकांची एकहाती सत्ता संपुष्टात आली होती. दरम्यान, क्रांतिची ठिणगी पडली होती त्या, इस्त्राइलला गॅस वितरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपातूनही त्यांना मुक्त करण्यात आले. २०१२ साली कनिष्ट कोर्टाने मुबारक यांना, ८४६ निदर्शकांच्या हत्येचे आदेश दिल्याप्रकरणी जन्मठेप सुनावली होती, ती आता रद्द झाली आहे.