Home बातम्या माडेल-थिवी येथे अपघातात १ ठार

माडेल-थिवी येथे अपघातात १ ठार

0

माडेल थिवी येथे काल रात्री ११.३० वा. एका दुचाकी वाहनाने विजेच्या खांबावर धडक दिल्याने दुचाकीस्वार शेख शब्बीर शदाब (२४), नागझर-डिचोली हा युवक जागीच ठार झाला तर मौसीन शेख (२१), डिचोली-बंदेवाडा हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत.

याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री ११.३० च्या सुमारास म्हापशाहून डिचोलीकडे जाणार्‍या जीए ०४ डी ४८९४ क्रमांकाच्या मोटारसायकलची विरुद्ध दिशेकडील रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक बसली होती. त्यात शराफ शबीर शेख या युवकाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर मौसीन शेख यास ही बराच मार लागल्याने त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याचीही तब्येत गंभीर आहे. म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर यांनी पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.