इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास पडकण्यात यश आले. २०१० सालच्या नवी दिल्लीतील जामा मशीद स्फोट प्रकरणात त्याच्या सहभागाचा संशय आहे. अजाझ शेख असे त्याचे नाव असून हा २७ वर्षीय यूवक पुण्याचा रहिवाशी आहे. शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशमधील सहारनपूर रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. म्होरक्या यासिन भटकळच्या अटकेनंतर २०१३मध्ये तो नेपाळात पळून गेला होता. काल त्याला १० दिवसांची कोठडी देण्यात आली. अजाझ हा पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवादी मोहसिन चौधरी याचा मेहुणा आहे. अजाझ इंडियन मुजाहिदीनसाठी तांत्रिक सहाय्यक म्हणून काम पाहत होता.