‘आधार’ पुन्हा सक्रिय करण्याचे संकेत

0
79

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आधार प्रकल्पाचा आढावा घेतला. विविध योजनांसाठी ‘आधार’ वापरून लाभार्थींना थेट बँक खात्यात अनुदान देण्याच्या पद्धतीची पुन्हा सुरूवात करण्याचे यावेळी चर्चेला आल्याचे कळते.
यूपीए सरकारने ‘आधार’ला स्थगिती दिली होती. दरम्यान, ‘आधार’ क्रमांकाच्या आधारे सरकारी कर्मचार्‍यांच्या हजेरीबाबत लक्ष ठेवणे शक्य आहे का, याबाबत शोध घेतला जाणार आहे. आतापर्यंत ६६.९९ कोटी आधार क्रमांक जारी करण्यात आले आहेत. १९.९५ कोटी लोकसंख्येचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये ४.६२ कोटी आधार क्रमांक देण्यात आले आहेत.
या उच्चस्तरीय बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग, दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद तसेच अन्य अधिकारी उपस्थितीत होते.